न्यायाचा रिकामा न्याय
न्यायाचा शुल्लक न्याय
न्यायाच्या खालती न्याय
न्यायाच्या वरती न्याय !!
न्यायाने करपल्या भावना
न्यायाने दडपल्या वेदना
मागच्या जन्मीचा हवाला
पुढच्या जन्मी मिळे न्याय !!
न्यायाची नाही कोणती रीत
ना याची हार ना त्याची जीत !!
---------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY