मी आसक्तीचा इंद्र नाही
मी विरक्तीचा शिव आहे !!
आसक्तीची विरक्ती नाही
विरक्ती साठी आसक्त आहे !!
अमृताच्या सर्व शोधात
मी कंठात घेतले गरळ आहे !!
तू मार्ग शोधून घे आपला
मी स्वताच एक मार्ग आहे !!
मृत्यू माझ्या मागोमाग
अमरत्व माझ्या सोबत आहे !!
मृत्यू काय बिगडविणार ?
माणूसकी जर अमर आहे !!
-----------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY