तुझावर चांदणे हे भाळले, होते कितीदा
सखे तू मोगर्याला माळले होते कितीदा
कसा प्रेमात भिजलो ओलवत्या सांजवेळी
सकाळी पावसाला टाळले होते कितीदा
वळूनी पाहता पुन्हा दिलाला बहर आला
जरी विरहात त्याला जाळले होते कितीदा
तुझ्या डोळ्यांतल्या रे तारकांना, भूलताना
असे रे स्वप्न माझे गाळले होते कितीदा
विराणी एकटी होती उभी घाटावरी या
नदीशी भेटणे तू पाळले होते कितीदा
विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY