Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

ती येते

 

ती येते
ह्रदयाच्या कोपर्यातुन
तिच्या शब्द कळ्यांना
भावनांचा दरवळ असतो

 

ती येते
तेव्हा तिच्या लोभस रुपाने
भोवताल सगळा मला
सोनेरी सोनेरी भासु लागतो
तिच्या स्पर्शाने माझ्यावर जणू सोन्याचा साज
चढु लागतो . . . .

 

इतक पिवळधमक रंगाने
अंगाला मढवते . . . .

 

ती येते
तिच्या मंद सुगंधाने
मखमलाचा दरवळ
घरभर पसरतो अणं
अवतीभवतीचा समा
हिरवा हिरवा होतो

 

या तिच्या रेशमी सुखाचा
गर्द पसार्याने मी मलाच
उगाळून घेतो

 

ती जाते
ह्रदयाच्या कोपर्यात
माझ्या काव्य फुलाला घेवुन
ज्याला मग गहिवरलेला
नाद असतो . . .

 

 

 

VishU .

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ