सखे मला तू हवीच आहे
तुझ्यावरी मी भुलून गेलो
सदा तुझा भास होत आहे
असा तुझ्याशी जुळून गेलो
फुलून आला जर्द मनाशी
तुला जणू मी बघून गेलो
सकाळ व्हावी तुझ्याच संगे
स्मरांत मी हे वदून गेलो
तुझेच वादे झुठे निघाले
जिवन तुझ्याविन जगून गेलो
सखे मला तू हवीच होती
अता फुलांनी मढउन गेलो
विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY