मला ते भासले काही
सत्य मी जाणले काही
असे का फेकचं निघते
खरे जे वाटले काही
गव्हाळी भूल पाङूनी
मळभ मग दाटले काही
झरे वाहुनि निर्मळाचे
दिलाशी आटले काही
जुन्या जखमां शमूनी गे
पुन्हा उरि पेटले काही
उकळुनी साय फूलाचे
दुग्ध ही फाटले काही
विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY