Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

देवा तुला शोधू कुठं .......

 

आजच्या माझ्या विषयाचे शीर्षक आहे ‘देवा तुला शोधू कुठं . मित्रहो , माझे असे ठाम मत आहे कि देव हा आकाशात नाही , देव हा फक्त मुर्त्यांमधेही नाही , देव हा माणसातही नाही . मग देव आहे कुठे ? आहे न देव आहे तो नक्कीच आहे कारण तो जर नसता ना तर जगात चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्हीही कधीच घडल्या नसत्या . देव हा आपल्या प्रत्येकाच्या अंतरात आहे . प्रत्येकाच्या भृकुटीवर एक देवस्थान आहे . जर आपण चित्त एकाग्र करून ध्यान लावून भृकुटीवर लक्ष एकवटले तर तुमच्या देवाचे तुम्हाला दर्शन घडेल .हा खरा तुमचा परमात्मा याचे दर्शन म्हणजे स्वतःत असलेल्या देवाचे दर्शन , याच्या संगतीने निर्मल माणूस अगदी पहाड चढून जावू शकतो ,भलेही मग तो पायाने अधू असला तरी , तात्पर्य देव हा आपल्या आपल्यात असतो , सापडायला हव फक्त त्या करिता सद्गुरू आवश्यक असतो .
पाप आणि पुण्य अशा कुठल्याही गोष्टी नसतात . या संकल्पना मानवनिर्मित आहे कारण माणसांचे वर्तन चांगले राहावे या हेतूने त्या मुद्दामून घडवल्या आहेत , हा सर्व संस्कारांचा भाग आहे . ज्या व्यक्तीवर संस्कार , मूल्य यांचा चांगला परिणाम असतो ना ती व्यक्ती खचितच एखादे वाईट कृत्य करेल कारण त्या व्यक्तीवर रुजलेले संस्कार तिला वाम मार्गावर जवूच देत नाही तेव्हा त्या व्यक्तीवर किंवा आपण सर्वांवर संस्कार करणारी व्यक्ती हि देव असते .
वाईट वागणाऱ्या लोकांकरिता ,वाईट संगतीतले , वाईट मूल्यांचे बीज खोवणारी व्यक्ती हि देव असते पण मग ती व्यक्ती सांगेन त्या प्रमाणेच दुष्कृत्ये करते अगदी चित्त एकवटून टाकत ती तशी वागते तिचा सद्गुरू तो वाईट वृत्तीचा मनुष्य असल्याने ती वाईटच बनत जाते अन दुष्कर्माने ती जगाचा र्हास देखील करू शकते कारण त्यांची प्रवृत्ती मुळातच वाईट बनलेली असते , माणूस संगतीत कुणाच्या येतो ते महत्वाचे राक्षसांच्या म्हणजेच वाईट लोकांच्या संगतीत देव शोधला तर वाईटच बनणार ,
तेव्हा हा सर्वस्वी , मनस्वी ,वैयक्तिक प्रश्न ठरतो कि आपण आपला आदर्श कुणाला ठरवायचे जेणेकरून आपल्यात अमुलाग्र बदल घडून एकतर देव बनू वा दैत्य .
तर अशाही चांगल्या वाईट लोकांच्या रुपात देव आहे .
माझ्या जीवना बाबतीत सांगायचे झालेच तर हो खरंच मी देव पाहिलाय , एकदा भल्या सकाळी कॉलेजला जायला निघालो होतो , भुकेला होतो फक्त एक कप चहा पिवून निघालेलो , त्यात बसही उशीर झाल्याने मिळत नव्हती म्हणून मग भेटल्या रिक्षात बसलो थोड्या वेळाने त्या रिक्षावाल्याचा हात मागे आला , मी जरा भेदरलो (हो , कारण कोण माणूस कसा आहे हे ओळखता येत नाही ना ,चेहरा पाहून) पण मग जेव्हा हळूच त्याने माझ्या तळव्यावर २ खारका ठेवल्या तेव्हा मी जरा निश्वास टाकला आणि मनोमन सुखावलो कारण अशा प्रकरे उर्जा मिळण्याची मला खरच नितांत गरज होती त्या खारका खाताना मी त्या काकांना धन्यवाद दिले , मला तेव्हा खरच जोरात ओरडवेसे वाटले “सांगा मुकुंद कुणी हा पहिला , गड्या ,मुकुंद मला रे भेटीला . पहा ना आपल्या भारतात सगळीकडेच आर्थिक दुर्बलता , आणि विषमता आहे , गरिबी पण जास्त आहे , श्रीमंती सुद्धा जास्त आहे , देश विकसित होण्याकडे वाटचाल करतोय परंतु राजकीय , सामाजिक , आर्थिकदृष्ट्या एक आधी निर्माण होतेय ठावूक आहे कुणाच्यात माणुसकी जपनार्यांत आणि ती पोखरनार्यंत या देशातून लोकांची दगड धोंड्यांवरची श्रद्धा गाढ होत चाललीये परंतु माणूस मात्र दुसर्या माणसाचा दुश्मन ,वैरी ,क्षत्रू बनलाय माणुसकीचा जराही अंश त्यात उरला नाहीये , आणि म्हणूनच आज कुणी हे मान्य करायला कधीच तयार होणार नाही कि देव हा माणसात असतो . खूप कमी लोक माझ्या उदाहरणाप्रमाणे दिसतील बाकी इथे गुंड , राजकारणी , पोलीस , अधिकारी , आदी पशु मानवी हाडामांसाच्या वेशात वावरत असतात .ते देव नाहीत , देव आपल्यापैकी फार थोडय माणसात शिल्लक आहे .
मी एक कवी आहे मित्रानो , मी रोज माझे चित्त शांत करून तासंतास मनान करत बसतो , माझ्या कवितांचे , चारोळ्या , गझलांचे मी तेव्हा ध्यान करतो आणि म्हणूनच मला माझा देव मला मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या व्यक्तीत आढळतो. कारण त्यांमुळे मी स्वतालाच समृद्ध करून घेणार असतो . तेव्हा आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या प्रत्येकांत देव हा आहे असे मला तन्मयतेने सांगावेसे वाटते .

स्वतःत , कुणा एकात , अनेकांत अशा प्रकरे वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या रुपात देव तुम्हाला सापडू शकतो , पण खरतरं हे तुम्ही तुमचे जीवन कसे जगाता यावरच अवलंबून असते . देव हा असतो , सापडत नाही त्याकरिता जिद्द , चिकाटी , मेहनत आदी प्रकरचे बरेच परिश्रम हे घेणे गरजेचे असते . आणि आपण म्हणतो ना , आता सगळे काळाच्या हातात , नशीब , नियतीच्या हातात मात्र याही संकल्पना काहीश्या चुकीच्याच वाटत मला ,सबब हि कि जितके प्रामाणिकपणाने प्रयत्न आणि निष्ठा , स्वतःवर संपूर्ण विश्वास ठेवून एखादे कार्य तडीस जर आपण नेवू पहिले तरच ते सिद्धीस जाते तुम्ही सिद्ध होतात , तुम्हाला तुम्च्ताला तुमचा देव भेटतो . सांगायचा भावार्थ हाच होता कि देव आपल्या कर्मात असतो .
तर अशा प्रकारे मी आपल्यापुढे माझे मत व्यक्त केले ,विषय होता देवा तुला शोधू कुठं तर शोध स्वतःत ,चांगल्या व्यक्तींत आणि स्वकर्मात , देव नक्कीच सापडेल ..

 

 

 

 

विशाल लोणारी

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ