झेंडे पताके फडकावून झाले
रात्रीच्या पार्ट्यांचे प्ल्यान ठरवून टाकले
फ्ल्याश पडत गेले , फिदीफिदी दात वेंगाडून झाले
गोताळ्याकडे सार्या ,शिवाजी महाराज
अभिमानाने पाहत असताना
पोझ देण्यापुरते मुजरे झडलेले पाहून
शौर्य त्यांचेही रडकुंडीला आले
रोजच्या पेक्षा आज जरा जास्तच
अंतर त्यांचे घुसमट घुसमट झाले
बाहेर येवून पुतळ्याच्या ,हात ठेवला खांद्यावर
बोलले बाळ विशू
स्वराज्यात आपुल्या हे रे काय घडले ……………………………
" आमच बरंच बोलणे झाले ,पण ते नंतर सांगेल
कविराज विशू
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY