आज काळीज विस्कटलं
तुझ्या अस्या जाण्याने
सौख्य तुझ हिरावलं
एका अल्लङ अविचाराने
पण तरीही मी प्रयत्न
करत राहते
तुझ्या येण्याची आस लावुन
पुन्हा पुन्हा त्या काङ्या
एकावर एक ठेवू पाहते
नाही जमले कधी
काङी विणायला तू पुन्हा
येशील का रे
उङून गेल्या ,पाखरा माघारी
परतशील का रे
तुझ्याविना आयुष्य अधूरे राहते
मला माफ तू करशील का रे
उङून गेल्या , पाखरा माघारी फिरशील का रे
विशु
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY