क्षण एक भावनांचा
चालून येत आहे
शब्द सुकले तरीही
कंठ दाटून येत आहे
मी पाहिलेल्या क्षणांनी
आज घात केला
समजून घेतले तरीही
क्षण निसटून जात आहे
जखमा कुरवाळण्याचा
मी उगा प्रयत्न केला
वेचलेल्या वेदनांचे
दुःख दाटून येत आहे
माझी अजिँक्य स्वप्ने
मी त्यागणार नाही
तुझ्याच स्मृतींसाठी
जग विसरून जात आहे
- शुभम साळुंखे
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY