तू मला, मी तुला, सांगतो का पुन्हा?
एकमेकां असे थांगतो का पुन्हा?
जाग आली जगाला कधीची तरी.......
वेंधळा कोंबडा बांगतो का पुन्हा?
पंख शाबूत, आकाशही मोकळे......
तू तरीही असा रांगतो का पुन्हा?
जीव खाऊन जगतोस ना रोज तू........
जीव रात्री तुझा टांगतो का पुन्हा?
आवरासावरी कर तिन्हीसांज ही.......
याच वेळी असा पांगतो का पुन्हा?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY