पोकळी सुद्धा नभाची जाहली आहे गुलाबी!
आज होळीला प्रियेची पसरली आहे गुलाबी!!
चेहरा दिसतो जगाचा रंगबेरंगी किती हा......
आज होळीचीच नवखी बरसली आहे गुलाबी!
दु:ख, सा-या वेदना, अन् यातना बाजूस ठेऊ......
आज होळीने जगाला आणली आहे गुलाबी!
कैक रंगांचीच कारंजी चहूबाजूस उडती.......
आज होळीचीच दुनिया नाहली आहे गुलाबी!
दूरवर आहे पसरला कैफ प्रेमाचा अलौकिक.......
झिंग होळीचीच दिसते....झिंगली आहे गुलाबी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY