न्यायासने घेतात माझा आज का ताळा?
ही जिंदगी सरली, न झाला न्यायनिर्वाळा!
का माणसे झालीत आता श्वापदे सारी?
की, ब्रह्मदेवानेच केला ब्रह्मघोटाळा!
आता हयातीतच उभे करतात ते पुतळे....
वरती न चुकता घालती कंठामधे माळा!
हे लोक गोरेगोमटे बाहेरुनी दिसती....
आतून त्यांचा रंग आहे कुळकुळित काळा!
दिनरात मी गझलेमधे आकंठ बुडलेला.....
जीवास माझ्या लागला न्याराच हा चाळा!
ते बालपण गेले फुका तारुण्यही गेले.....
साठीमधे झाली जिण्याची का सुरू शाळा?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY