जुन्याच जखमा त्या ठसठसती अजून सुद्धा!
जुनीच स्मरणे, ती रिमझिमती अजून सुद्धा!!
ठेच लागली असेल यारांनाच वाटते........
फिरून अश्रू कसे तरळती अजून सुद्धा?
वाटचाल वास्तवात चालू अजून आहे.......
जथे स्मृतींचे पण, भिरभिरती अजून सुद्धा!
हात अतीताचा केव्हाचा दिला सोडुनी.....
गतकाळाची भुतेच छळती अजून सुद्धा!
छाया सुद्धा मला सोडुनी गेली माझी.......
पाय कुणाचे साथ चालती? अजून सुद्धा!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY