
अधोमुखीसी तू, वाटतेस बेचैनी!
उरात का ऐशी, झाकतेस बेचैनी?
जरूर स्पंदन ऐकून, सांग, हृदयाचे.......
उरात का माझी, दडवतेस बेचैनी?
क्षणात एखाद्या, प्रीत कोवळी जडते.......
स्मरून तो क्षण का, सोसतेस बेचैनी?
तुझ्या हवाली मी, जिंदगीच केली ही.......
उरी, तरी का तू, बाणतेस बेचैनी?
तुझ्या जिवावरती मी, झुगारतो दुनिया.......
तरी अशी का तू, भासतेस बेचैनी?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY